सैनिक शाळा सातारा - माझा अनुभव !
नमस्कार, आज मी सैनिक शाळा सातारा मध्ये घेतलेला अनुभव share करणार आहे. मी सैनिक स्कूल मध्ये इयत्ता ६वी पासुन शिक्षण घेत आहे. सैनिक स्कूल सातारा विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा. चला तर मग सुरु करूयात!
परीक्षेचे नाव | अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) |
संचालन प्राधिकरण | राष्ट्रीय टेस्ट एजन्सी (NTA) |
आवेदन प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
Official वेबसाईट | www.sainiksatara.org |
इयत्ता ६वी साठी जागा | मुली - 10 मुले - 80 |
इयत्ता ९वी साठी जागा | मुले - 12 |
परीक्षेची पद्धत | प्रत्यक्ष (Offline) |
साठी आयोजित | सहावी व नववीच्या वर्गात सैनिक शाळेत प्रवेशासाठी |
निवड प्रक्रिया |
|
परीक्षेची वारंवारता | वार्षिक (Annually) |
प्रवेश प्रक्रिया (Admission process)
सैनिक शाळा सातारा मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम आपल्याला लेखी परीक्षा द्यावी लागते. बरेच मुले लेखी परीक्षा देतात. त्यातून २५०-३०० Candidates मेडिकल टेस्ट साठी पात्र होतात. त्यातून 100 मुलांची निवड होते. पुढची प्रक्रिया तुम्हांला शाळेद्वारे कळवली जाते.
पात्रता निकष (Eligibility Criteria)
- इयत्ता सहावी: मुलाचा जन्म 01 एप्रिल 2009 ते 31 मार्च 201१ दरम्यान झाला पाहिजे.
- नववी इयत्ता: मुलाचा जन्म 01 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 दरम्यान झाला पाहिजे. मुलाने मान्यताप्राप्त शाळेत आठवीत शिकले पाहिजे.
लेखी परीक्षेचे केंद्र (Written Exam Centre)
- अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, महाड, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सातारा आणि सोलापूर
- सातारा (फक्त एक)
सैनिक स्कूल प्रवेशपत्र (Admit Card)
सैनिक शाळा सातारा प्रवेश 202२ चे प्रवेशपत्र निर्धारित तारखेनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध होईल. प्रवेश पत्रांची माहिती योग्य प्रकारे तपासण्यासाठी उमेदवारांना सूचित केले जाते. छापील प्रवेश पत्र देखील प्रत्येक उमेदवाराला टपालाने पाठवले जाईल.
माझा वैयक्तिक अनुभव (My Personal Experience)
तर आता मला साधारण ३ वर्षे या शाळेत पूर्ण झालेत. सैनिक स्कूल सातारा मध्ये एकूण ६ Boarding Houses आहेत. त्यामध्ये २ Junior(इयत्ता ६वी आणि ७वी) आणि ४ Senior Houses(इयत्ता ८वी ते १२वी) आहेत. मी ६वी मध्ये Nehru House मध्ये होतो. मला ८वी मध्ये Lal Bahadur Shastri House भेटले. प्रत्येक House ला एक House Suprident/Matron असतात. एका Houseमध्ये चार Dometries असतात. शाळेच्या कॅम्पस ४-५ फूटबॉल मैदाने आहेत. आंतरराष्ट्रीय स्तराचे बास्केटबॉल Ground आहे.
सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत शाळा असते. प्रत्येक वर्गामध्ये SmartBoard आहेत. जेणेकरून विद्यार्थी Internet चा पण वापर करून शिक्षण घेऊ शकतात. वर्ग प्रशस्त आहेत. सगळे शिक्षक खूप छान शिकवतात.
जर तुम्हांला/तुमच्या पाल्याला NDA मध्ये जायचे असेल तर हमखास या शाळेसाठी तयारी करू शकता. या शाळेमध्ये असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुमचे आरोग्य सुदृढ होते. या शाळेमध्ये Physical Training कडे जास्त लक्ष दिले जाते. सैनिक स्कूल सातारा मध्ये अशा काही सुविधा आहेत ज्या आपल्याला सर्वसाधारण शाळांमध्ये मिळत नाहीत. जसे की,
- NCC / राष्ट्रीय छात्र सेना
- Physical Training / शारीरिक प्रशिक्षण
- Swimming Classes / पोहण्याचे वर्ग
- Horse Riding / घोडेस्वारी
- Auditorium A/C / सभागृह ए / सी
- MI Room / एमआय रूम
- Ball Sports / बॉल स्पोर्ट्स
![sainik school Auditorium sainik-school-Auditorium](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEieljGh3Ac6s1zFMtIt8jKeLKQAD-0xgDTaPs7C_QIh1AOF_65aSG_UDaoQBSyihK5jcD68uzZ-znPpNjZvW0OuamBeZYAKHHrAQGaB21J5irKMkb53CCi1KGPBIpmpexQEkCDhVWOM8wwx/w320-h240/auditorium-min.jpg)
Fee Structure
साधारण १ ते सव्वा लाख एका वर्षाची फी आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. कशासाठी किती पैसे आकारले जातात ते पण दिलेले आहे.
Sr No |
Heads |
Quarterly basis Rs. |
Half-yearly basis Rs. |
Yearly basis Rs. |
---|---|---|---|---|
1 | Fees | 20,065 |
40,030 |
79,860 |
2 | Clothing | 1,500 | 1,500 | 1,500 |
3 | Cadet Messing | 15,486 | 15,486 | 15,486 |
4 | Pocket Money | 1,500 | 1,500 |
1,500 |
5 | Incidental charges | 1,500 | 1,500 | 1,500 |
6 | Additional charges | 20,150 | 20,150 | 20,150 |
7 | Caution Money (General) | 3,000 | 3,000 | 3,000 |
8 | Total payable by General Cadet at the time of admission | 63,201 | 83,166 | 1,22,996 |
9 | Total payable by ( SC/ST cadet) at the time of admission | 61,701 | 81,666 | 1,21,496 |
10 | Remaining tuition fees. Payable in installments | Rs 20,065/- to be paid towards quarterly fees payable on 1 st of each quarter i.e 01 Sep, 01 Dec, and 01 Mar | Rs 40,030/- to be paid towards fees II nd half yearly installment payable on 01 Dec | At the time of reopening of the school |